आज य जिल्ह्यात जोरदार ; पुढील काही तासात या जिल्ह्यात मुसळधारेचा अलर्ट,
महाराष्ट्रात पुढील 2 ते 3 तासात उत्तर महाराष्ट्रासह, मराठवाड्यातील काही जिल्हे आणि कोकण घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय…उर्वरित जिल्ह्यात ढगाळलेलं वातावरण आणि बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान खात्याने दिली आहे.
1) पुढील काही तासात य जिल्ह्यात पावसाचा अंदाज..?
महाराष्ट्रातील मराठवाडा, जालना तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा, यल्लो अलर्ट हवामान खात्याने दिला आहे. तसेच बिड,परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, आणि धाराशिव या जिल्ह्यात कोनताही अलर्ट नाही फक्त तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे.
2) उत्तर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज..?
नाशिक, धुळे, आणि नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा आँरेंज तसेच जळगाव जिल्ह्यात जोरदार पावसाचा यल्लो अलर्ट हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.
3) घाटमाथावर पावसाचा अंदाज
विदर्भातील सर्वच जिल्हे, मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, सोलापूर आणि सांगली तसेच मराठवाड्यातील जालना तसेच संभाजीनगर वगळता ईतर जिल्ह्यात हवामान कोरडे राहील तुरळक ठिकाणीच हलका पाऊस पडेल असा अंदाज IMD कडून व्यक्त केलाय.