शेतकऱ्यांना आनंदाची बातमी : नमो 7 वा हप्ता आला.. लवकरच आपल्या खात्यात..

शेतकऱ्यांना आनंदाची बातमी : नमो 7 वा हप्ता आला.. लवकरच आपल्या खात्यात..

शेतकरी मित्रांनो नमस्कार.. राज्यातील नमो शेतकरी योजनेच्या प्रतिक्षेत असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना आनंदाची बातमी.. अखेर नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांची या ठिकाणी संपलेली आहे.. तसेच नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याच्या वितरणासाठी 1932.72 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे..

राज्य सरकारने सुरू केलेली नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या, व नमो शेतकरी हप्त्याची प्रतीक्षा 94 लाख शेतकरी करत होते मात्र आता या ठिकाणी शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे.. मागील काही दिवसांमध्ये नमो शेतकरी योजना शासनाने बंद केली अशी अफवा पसरली होती. त्यावरून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.

मात्र आता राज्य सरकारने याबाबत सुधारित शासन निर्णय जीआर निर्गमित केला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता मिळण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे.

2) शेतकऱ्यांना आनंदाची बातमी : नमो 7 वा हप्ता आला.. लवकरच आपल्या खात्यात..

पी एम किसान योजनेच्या धरती वरती राबवली जाणारी योजना ही नमो शेतकरी योजना असून, या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये स्वातंत्रपणे आर्थिक मदत म्हणून दिली जाते. तसेच हा निधी योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यात कोणत्याही गैरव्यवहार होणार नाही याची खात्री करण्याची जबाबदारी राज्य सरकारने कृषी आयुक्तालयावर सोपवण्यात आले आहे.

Leave a Comment